Ola cabs success story
How did Ola become successful?
Is Ola a successful startup?
What is Ola history?
Who is the founder of Ola cabs?
ओला कॅब सक्सेस स्टोरी
पूर्वी लोकांना खाजगी वाहने न वापरता प्रवास करायचा असल्यास रिक्षा किंवा बसच्या साह्याने प्रवास करावा लागत असे, जर जास्त लांबचा प्रवास असेल तर रेल्वेच्या साह्याने केला जायचा. बऱ्याच लोकांना बसचे वेळापत्रक माहीत नसल्यामुळे समस्या यायच्या, कधी कधी रिक्षा किंवा खाजगी वाहन भाड्याने केले तर भाडे जास्त यायचे तसेच ज्या ठिकाणी पोहोचायचे आहे त्या पत्त्यावर ती बस किंवा रिक्षा डायरेक्ट जात नसली तर स्टँडवर उतरून तेथून त्या घरापर्यंत पायी जावे लागत असे अशा काही समस्या लोकांना येतात. परंतु आज काल कॅबच्या सुविधेमुळे ज्या ठिकाणी पोहोचायचे आहे तिथला पत्ता अचूक माहिती असल्यास कॅब बुक केल्यानंतर अगदी त्या घराच्या दाराशी आपण पोहोचतो.ओला कॅब बद्दल तर भारतातील जवळपास सर्वांनाच माहीतच असेल. ” ओला कॅब ” ही भारतातील पहिली कॅब/टॅक्सी एग्रीगेटर कंपनी आहे. “ओला ” हा शब्द स्पॅनिश वर्ड ” होला ” यापासून घेतलेला आहे. होलाचा अर्थ हॅलो असा होतो.
ओला या कंपनीची स्थापना अशा पद्धतीने झाली की, ओला या कंपनीचे संस्थापक भावीश अग्रवाल यांनी एकदा भाड्याने कार बुक केली असता त्यांना वाईट अनुभवाचा सामना करावा लागला म्हणून त्यांना ओला कॅब बद्दलची कल्पना सुचली आणि त्यांनी ती प्रत्यक्षात यशस्वीरित्या उतरवली. भावीश अग्रवाल आणि अंकित भाटी यांनी डिसेंबर 2010 (काही ठिकाणी जानेवारी 2011 असा देखील उल्लेख आहे) रोजी ” ओला कॅब ” या कंपनीची स्थापना केली. भावीश अग्रवाल हे ओला कॅबचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक आहेत. भावीश अग्रवाल यांचा जन्म लुधियाना, पंजाब येथे झाला. भावीश अग्रवाल यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ,मुंबई येथून कम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग हे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये काम केले.अंकित भाटी हे ओला कॅबचे संस्थापक आणि CTO (मुख्य तांत्रिक अधिकारी) आहेत. अंकित भाटी यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. अंकित यांनी त्यांचा मित्र भावीशची कॅब सेवा सुरू करण्याची कल्पना ऐकल्यानंतर त्या मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जेव्हा ही स्टार्टअप सुरू केली त्यांना देखील इतर स्टार्टप्रमाणेच काही अडथळ्यांचा सामना करावा लागला परंतु त्यांनी ते अडथळे पार करून ओला कॅब ला यशस्वीपणे पुढे नेले आणि आज ओला कॅब फक्त भारतातच नव्हे तर इतर देशांमध्ये ही जसे की ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड किंगडम इथेही सर्विसेस देतात. ओला हे एक जलदमान गतीने वाटणाऱ्या स्टार्टअप पैकी एक आहे.
एके दिवशी भावीश अग्रवाल हे बेंगलोर ते बांदीपूर असा भाड्याच्या कारने प्रवास करत असताना त्यांना काही वाईट अनुभवांचा सामना करावा लागला तेव्हा त्यांच्या लक्षात आली की त्यांच्यासारखंच इतर लोकांना देखील काही वाईट अनुभव येत असतील तेव्हा त्यांनी कॅब बुकिंग स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला. Olatrips.com या नावाची भावीश अग्रवाल यांनी ट्रॅव्हल एजन्सी सुरू केली परंतु त्यात त्यांना यश आले नाही. त्यानंतर त्यांनी त्यांचा मित्र अंकित भाटी यांच्यासोबत “ओला कॅब” हे कार नेटवर्क सुरू केले. 2011 ते 2014 यादरम्यान ते दोघे आणि त्यांचे काही सहकारी यांनी बेंगलोर मधील एका 1 बीएचके अपार्टमेंट मध्ये काम केले. त्यांना एम्पलॉइज आणि फंडिंग च्या कमतरतेमुळे काही समस्यांचा सामना करावा लागला.
2014 पर्यंत, ओला कॅबचे जवळपास 100 शहरांमध्ये सुमारे 2,00,000 कारचे नेटवर्क होते. 2015 मध्ये, युनिकॉर्न क्लबमध्ये प्रवेश करणारी ओला कॅब ही सर्वात जलद भारतीय कंपनी बनली. ओला कॅबची आता जवळपास $6.5 अब्ज इतकी संपत्ती असून भाविश अग्रवाल हे 40 वर्षाच्या खालील तरुण स्वयंनिर्मित अब्जाधीश ( youngest self made billionaire) आहेत.